You are currently viewing मोबाईल

मोबाईल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोबाईल*

 

मोबाईलच्या मायावी पाशात

सारी दुनिया अडकली

लहानांपासून वृद्धांपर्यंत

मोबाईललाच चिकटली

 

भाषेच्या पुस्तकातील धडे

मोबाईल गुरुजी शिकवतो

गणितातील अवघड कोडी

चुटकीसरशी सोडवतो

 

कार्टून दाखवत गाणी गात

बाळाला सहजच भरवतो

फेसबूक इन्स्टाच्या दुनियेत

बेधुंद तरुणाईस रमवतो

 

इंटरनेटचे जाळे टाकून

माणसांना जवळ आणले

माणसातले माणूसपण मात्र

झपाट्याने हरवत चालले

 

रील्स व्हिडिओ स्टेटसमध्ये

माणूस स्वतःला विसरला

एकाच छताखाली राहूनही

एकमेकांशी संवाद थांबला

 

लखलखत्या चंदेरी जगात

मोबाईल देतो पक्की साथ

आरोग्याची हानी करून

प्रत्येकाचाच करतो घात

 

*🖋️© सौ.आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा