*धनगर समाज सहित भटके विमुक्त ओबीसींना राणे साहेब व भाजपा महायुतीकडून मिळालाय न्याय*
*मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणेंना बहुमताने विजयी करा भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे*
*वैभववाडी-*
वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे साहेब व राष्ट्रीय सचिव विनोदजी तावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या प्रचार सभेत भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांनी आरक्षित समाजाच्या बाजूने कधीही आवाज उठवला नाही याउलट राणे कुटुंबीय व भाजप महायुती यांनी धनगर समाजासहित भटके विमुक्त ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम केले आहे. भटके विमुक्त, ओबीसींसाठी महाविकास आघाडीचे काम शून्य आहे. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये अनेक प्रभावशाली योजना भटके विमुक्त ओबीसींसाठी राबवण्यात आल्या आहेत तसेच आमदार नितेश राणे यांचे काम देखील मतदार संघात दमदार आहे त्यांच्या कार्यातून मतदार संघाचे नाव अव्वल झालेला आहे असे सांगत नवलराज काळे यांनी नितेश या नावाचा अर्थच आपल्या भाषणात मांडला.
*नि -निर्भीडपणे जनतेचे प्रश्न मांडणारे नेतृत्व*
*ते – तेजस्वी – विकास कामातून विधानसभा मतदारसंघात तेजस्वी प्रकाश पडणारे नेतृत्व*
*श -शक्तिशाली- आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे शक्ती उभी करून जनसामांन्याचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व*
म्हणजे नितेश राणे साहेब होय.
या कणखर व कृतिशील कार्यसम्राट अशा नेतृत्वाला 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रचंड बहुमताने विजयी करून विजयाची हॅट्रिक करण्यात आपलं योगदान सर्वांनी दिलं पाहिजे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना चालू केली या योजनेवर ती विरोधकांनी हल्लाबोल करत ही योजना बंद पाडण्याकरिता न्यायालयाचे दार सुद्धा वाजवले. ही योजना चालू केल्यानंतर आमच्या राज्याचा आर्थिक बजेट कोलमडेल, राज्यावर कर्जाचा भार येईल, आमचा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना बंद पाडू, महायुती सरकार निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवत आहे ही योजना ती बंद पाडतील चालणारच नाही अशा प्रकारचे वक्तव्य करत होते. परंतु माता-भगिनींच्या खात्यावरती योजनेचे पैसा जमा झाले राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वी चालू राहील अशी विरोधकांना खात्री झाल्यानंतर आमचे महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजना आम्ही बंद पाडू असं म्हणणारे महाविकास आघाडीचे नेते यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना 3000 देतो असा आश्वासन दिला आहे. परंतु माझा आपल्याला असा सवाल आहे आपली लाडकी बहीण योजनेतून महायुतीने आपल्याला चालू करून दिले ते पंधराशे रुपये बंद करण्यासाठी कोर्टाचे दार ठोकवणाऱ्या ह्या महाविकास आघाडीचे नेते तुम्हाला तीन हजार रुपये देतील असं वाटतंय का…? आज पर्यंत त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासना पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे ते आपल्याला अशी योजना लागू करून देणारच नाहीत म्हणूनच आपल्याला आतापर्यंत ज्या महायुती सरकारने वेळोवेळी सहकार्य केलंय सर्वांगीण विकासासाठी विकास कामे दिले आजपर्यंत प्रभावशाली राबवलेल्या योजना कायमस्वरूपी आपल्याला चालू ठेवायचे असतील तर या राज्यामध्ये आपल्याला महायुतीला पुन्हा एकदा निवडून आणायचा आहे. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे साहेब सुद्धा निवडून गेले पाहिजेत. तरच राज्यात राबवलेल्या प्रभावशाली योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतील.या राज्यामध्ये आरक्षणासाठी धनगर समाज ओबीसी समाज मराठा समाज आरक्षित समाज आपल्या आरक्षणासाठी लढा देत होतं त्यावेळी हे महाविकास आघाडीचे विरुद्ध पक्षाचे नेते कोणत्या बिळात लपले होते का नाही त्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्यांना संधी होती या समाजाच्या आवाज बनून त्यांच्या बाजूस ठामपणे उभे राहण्याची. परंतु या विरोधकांनी आरक्षित समाजाच्या बाजूने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.दुटप्पी भूमिका त्यावेळी विरुद्ध पक्षांची होती परंतु तेच विरोधक आज महायुतीच्या विरोधात तुमचा आमचा विषय घेऊन प्रचार करतायेत. जेव्हा खरी समाजाला गरज होती त्यावेळी समाजाच्या बाजूने विरुद्ध पक्ष म्हणून कधी उभे राहिले नाहीत परंतु निवडणूक आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा घेऊन हे वाडी वस्ती वरती येतील प्रचार करतील महायुतीने तुमची फसवणूक केली आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं सांगतील परंतु माझ्या धनगर भटक्या विमुक्त ओबीसी बौद्ध, मराठा समाजाला मी सांगू इच्छितो भाजपा महायुती कालही आपल्या सोबत होती आजही आहे आणि उद्याही असणार आहे.त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता खोटा प्रचाराचा मुद्दा घेऊन वाडी वस्ती वरती येणाऱ्या विरोधकांना तुम्ही प्रश्न विचारा जेव्हा आम्ही लढा देत होतो तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपले होता..? का नाही आमची बाजू विधानभवनात तुमच्या आमदारांनी मांडली का नाही तुमच्यातला एकही नेता आमच्या सोबत लढा द्यायला आमच्या पाठीशी उभा राहिला आता मता पुरती आमचा समाज तुम्हाला आठवतो का अशा प्रश्नांचा भडीमार करा आणि खोटा खोडसाळ मुद्दा घेऊन समाजाची दिशाभूल करून प्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीला तुम्ही सर्वांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतपेटीतून उत्तर द्या व सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांना निवडून आणण्याकरिता बॅलेट मशीन वरील दोन नंबरचे कमळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्यांच्या विजयाचे हॅट्रिक करून आपला सर्वांगीण विकास करण्याकरिताचा आपण मार्ग मोकळा करा असे आवाहन उपस्थित मतदार बंधू भगिनींना नवलराज काळे यांनी केले.