You are currently viewing गणेशोत्सव काळात कोकणात ज्यादा गाड्या सोडा

गणेशोत्सव काळात कोकणात ज्यादा गाड्या सोडा

ठाकरे सेनेची रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी; एजंटचा काळाबाजार रोखण्याचे आवाहन…

कुडाळ

गणेशोत्सवाच्या काळात तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात याव्यात, बेकायदेशीर एजंटना आळा घालण्यात यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी आज रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत लवकरात-लवकर सकारात्मक भूमिका घेऊन धोरण ठरवले जाईल, असे आश्वासन यावेळी लालवानी यांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आमदार सुनील प्रभू , आमदार रमेश कोरगावकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सुधीर मोरे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांची लालवाणी यांच्या समवेत आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत खासदार राऊत यांनी गणेशोत्सवात ४ महिने आधी आरक्षित तिकिटे मिळत नसून एजंट आयआरसीटीसी आयडीचा गैरवापर करीत असून बेकायदेशीर पद्धतीने तिकिटे काढली जातात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशाला कोकण रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत. त्यामुळे बेकायदेशीर एजंटना आळा बसणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. तसेच यंदा गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या चालविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली
तसेच लाखो पर्यटक वर्षभर कोकणाला भेट देतात. त्यामुळे मंगलोर एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये त्यांच्या आराम आणि सोयीसाठी AC-I कोच आणि अनारक्षित डबे जोडण्याची गरज आहे. शिवाय, परदेशी आणि देशी प्रवाशांना चांगल्या दर्जाचे जेवण देण्यासाठी या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये विशेष पॅंट्री कारचीही गरज असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =