You are currently viewing तेर्सेबांबर्डे येथे रिक्षाला स्विफ्टकारची धडक बसल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी

तेर्सेबांबर्डे येथे रिक्षाला स्विफ्टकारची धडक बसल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी

कुडाळ

रिक्षा व स्विफ्ट कार यांच्यात जोरदार झालेल्या अपघातात केळूस येथील रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. अचानक रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालक असताना हा अपघात घडला. त्याला वाचविण्यासाठी कार चालकाने गाडी थेट डिव्हायडरवर चढवली. मात्र तरीही दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. हा अपघात आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास तेर्सेबांबर्डे परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर घडला.
यावेळी महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेल्या रिक्षा चालकाला खासगी गाडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित रिक्षा चालकाचे अद्याप पर्यंत नाव कळू शकले नाही तर कार चालक हा मुंबई येथील आहे. तो सद्यस्थिती ओरोस येथे रुग्णासमवेत आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत पोलिस ठाण्यात काहीच दाखल नाही, असे कुडाळ पोलिसांकडुन सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा