कुडाळ भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

कुडाळ भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन

कुडाळ

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री रणजित देसाई यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवकदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध समाजोपयोगी कार्यातून युवकांनी पक्षाची प्रतिमा अधिक प्रभावीपणे तळागाळात पोहोचवावी, असे प्रतिपादन श्री रणजित देसाई यांनी केले. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष श्री विनायक राणे, नगराध्यक्ष श्री ओंकारजी तेली, नगरसेवक श्री सुनील बांदेकर, नगरसेविका सौ साक्षी सावंत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, शहर अध्यक्ष श्री राकेश कांदे, युवामोर्चा अध्यक्ष श्री रुपेश कानडे, श्री मोहन सावंत, श्री.श्रीपाद उर्फ पप्या तवटे, श्री.संजय वेंगुर्लेकर, महिला शहराध्यक्षा सौ ममता धुरी, सोशल मीडिया जिल्हासंयोजक श्री अविनाश पराडकर, प्रसन्ना गंगावणे, सुश्मित बांबुळकर, स्वरूप वाळके आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा