You are currently viewing मतदारराजा जागा हो’ या विषयावर मालवणात खुली वक्तृत्व स्पर्धा…

मतदारराजा जागा हो’ या विषयावर मालवणात खुली वक्तृत्व स्पर्धा…

मतदारराजा जागा हो’ या विषयावर मालवणात खुली वक्तृत्व स्पर्धा…

मालवण

मालवण नगर परिषद आणि नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नगर वाचन मंदिर, सभागृह येथे ‘मतदारराजा जागा हो !’ या विषयावर खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील संसदीय आणि विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडणे, या निवडणुका सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण आणि अधिक सहभागात्मक व्हाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने सन २००९ पासून SVEEP (सिस्टमेटिक व्होटर एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन) लागू केले आहे. या अंतर्गत या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

समाजामध्ये मतदानाविषयी जनजागृती करणे हा वक्तृत्वाचा आशय असावा. वय वर्षे १८ व त्यावरील कोणत्याही व्यक्तिला या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. १,५००/-, १,०००/-, ७५०/- व दोन उत्तेजनार्थ क्रमाकांना प्रत्येकी रु. ५००/- रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात येईल. नावनोंदणी दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संजय शिंदे, ग्रंथपाल नगर वाचन मंदिर (९४२२२३४९५०) यांच्याकडे करावी, या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे व नगरवाचन मंदिरचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा