You are currently viewing चंगू मंगू च्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही..

चंगू मंगू च्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही..

ठाकरे – राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

मुंबई –

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला आहे.

या मुलाखतीवरून आता निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही.

 

चंगू मंगू च्या फालतू गप्पा, असं म्हणत राणे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले कि, सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू. आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतल्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eleven =