You are currently viewing कुडाळ – पणजी बससेवा वाहतुकीस सज्ज…..

कुडाळ – पणजी बससेवा वाहतुकीस सज्ज…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचं पालन करून उद्या पासून होणार कुडाळ-पणजी बससेवेला सुरुवात

कुडाळ
संपुर्ण राज्यात कोविड 19 (कोरोना )विषाणू च्या प्रतिबंधक निमित्ताने लॉकडावून कालावधीत बससेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. ते शिथिल झाल्यानंतर राज्यशासनाच्या निर्णयाने आंतरराज्य बस वाहतूक परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कुडाळ आगरातुन दिनांक १०अक्टोबर पासून कुडाळ ते पणजी या मार्गावरील पूर्ववत बस सेवा चालू करण्यात येत आहे असे कुडाळ आगर प्रमुख यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक फेरी नंतर बस कोविड संसर्ग होऊ नये म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करून, आल्यानंतर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. प्रत्येक प्रवासी यांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 20 =