गायीच्या शेणापासून बनवलेल्या वेदिक रंगांची निर्मितीचा गडकरींच्या हस्ते प्रारंभ

गायीच्या शेणापासून बनवलेल्या वेदिक रंगांची निर्मितीचा गडकरींच्या हस्ते प्रारंभ

गायीच्या शेणापासून बनवलेल्या वेदिक रंगांची निर्मितीचा गडकरींच्या हस्ते प्रारंभ

गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या खादी ग्रामोद्योग विभागाने व्यावसायिक स्वरुपात या रंगांची निर्मिती केली आहे.
गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या खादी ग्रामोद्योग विभागाने व्यावसायिक स्वरुपात या रंगांची निर्मिती केली आहे. केंद्रीय परिवहन, रस्ते विकास आणि सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रंगांचे लाँचिंग करण्यात आले. गडकरी यांनी या प्रसंगी खादी ग्रामोद्योग विभाग आणि गायीच्या शेणापासून रंगांच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्यांचे अभिनंदन केले.
हे रंग अँटी व्हायरल आणि नैसर्गिक आहेत. या रंगांची विक्री मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. यातून देशाच्या ग्रामीण भागासाठी रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, असे गडकरी म्हणाले. परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध असलेल्या या रंगांमुळे वासाचा त्रास होत नाही. हे गंध विरहीत रंग आहेत. गायीच्या शेणापासून तयार केलेले हे रंग इकोफ्रेंडली (पर्यावरणासाठी अनुकूल), नॉन टॉक्सिक, अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या नांकनांच्या चौकटीत बसणारे असे हे रंग आहेत.

गायींचे संगोपन करणारे शेतकरी रंगांच्या निर्मितीसाठी शेणाचा नियमित पुरवठा करुन वर्षाला ५५ हजार रुपयांपर्यंतची कमाई सहज करू शकतो. याच कारणामुळे हे रंग व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी सोयीचे आहेत. डिस्‍टेंपर पेंट आणि प्लॅस्टिक इम्युलेशन पेंट अशा दोन स्वरुपात हे रंग उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा