कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला
देवगड:
सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला.
देवगड तालुका मागास राहू नये म्हणून आमदार नितेश राणे सतत जागृत असतात. पाणीपुरवठा, दूरसंचार, रस्ते, वीज या सुविधा त्यांनी आणून मतदार संघ प्रगतीपथावर ठेवला आहे. असे मत मुळम यांनी व्यक्त केले. कलाकार म्हणून आमदार नितेश राणे यांचा आम्हाला अभिमान आहे कलाकारांच्या अनेक प्रश्नाकडे आमदार नितेश राणे व महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात लक्ष दिले आहे. यातून अनेक समस्या सुटल्या आहेत असेही अजित मुळम म्हणाले.
या वेळी भाजपचे नेते अजित गोगटे, बाळा खडपे, संदीप साटम, राजू शेट्टे, संजय बोंबडी, आणि रवींद्र तिर्लोटकर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.