आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची प्रचारात आघाडी…

आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची प्रचारात आघाडी…

वेंगुर्ला

शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दिपक केसरकर, माजी आमदार शंकर कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांकडून आपल्याला पूरक वातावरण असून दोन्ही कडे शिवसेना विजय मिळवेल असा विश्वास तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूकी साठी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होताच शिवसेनेने श्री देव वेतोबा व सातेरी देवीला श्रीफळ ठेऊन प्रचाराला शुभारंभ केला होता. सर्वच उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसे होईल याकडे लक्ष देत आहेत. दरम्यान शिवसेनेने दोन्ही ठिकाणी प्रचारात आघाडी घेतली आहे. कुडववाडी परिसरात कुडव कुटुंबीयांची कुलदेवी भवानी देवी मंदिर टेम्बवाडी ते सखेलेखोल अशी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी एकनाथ कुडव, संतोष कुडव, शांताराम कुडव, केशव कुडव, भानुदास कुडव यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा