उद्घाटन झालेल्या विकास कामांसाठी निधी मीच दिला…

उद्घाटन झालेल्या विकास कामांसाठी निधी मीच दिला…

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, गावागावात कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह निर्माण झाला असून, गावागावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. परंतु काही विरोधक हे बदनामी करून आपण विकास कामासाठी पैसे आणले अश्या आविर्भावात वागत असल्याचा आरोप आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, सावंवाडी शहरात काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या विकास कामांसाठी निधी मी दिला होता. तरी विरोधक  खोटी बदनामी करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे ही ते म्हणाले.

यावेळी शहरात आपण पुनर्वसन केलेल्या व्यापाऱ्याची पिळवणूक होत असून त्यांना धमक्या देखील देण्यात येत आहेत. तसेच अनेक अनधिकृत स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन आमदार केसरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा