शेर्पे येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त

शेर्पे येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त

आ.नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.

वैभववाडी
शेर्पे ता. कणकवली येथील सजाला कित्येक दिवस कायमस्वरुपी तलाठी नसल्यामुळे या परिसरातील शेर्पे, बेर्ले, चिंचवली आणि कुरंगवणे या गावातील जनतेची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सुर्यकांत भालेकर यांनी शेर्पे येथे कायमस्वरुपी तलाठी मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांना निवेदन दिले होते. त्याची तात्काळ दखल घेऊन आ. नितेश राणे यांनी कणकवली प्रांताधिकार्‍यांची भेट घेऊन शेर्पे येथे कायमस्वरुपी तलाठी देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कणकवली तहसीलदारांनी शेर्पे येथे कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक केली आहे. शेर्पे परिसरातील जनतेची गैरसोय दूर केल्याबद्दल येथील जनता आमदार नितेश राणे तसेच कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे आभारी असल्याचे सूर्यकांत भालेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा