महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वाटप
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या निवडणुकीसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहेत.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह (कंसात)
268 – कणकवली विधानसभा मतदार संघात 06 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात चंद्रकांत आबाजी जाधव- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नितेश नारायण राणे- भारतीय जनता पार्टी- (कमळ), संदेश भास्कर पारकर- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- ( मशाल), गणेश अरविंद मान- अपक्ष- (ट्रक), नवाझ ऊर्फ बंदू खानी- अपक्ष- (बॅट), संदेश सुदाम परकर- अपक्ष- (चिमणी) यांचा समावेश आहे.
269- कुडाळ विधानसभा मतदार संघात 05 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात कसालकर रवींद्र हरिश्चंद्र- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नाईक वैभव विजय- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- (मशाल), निलेश नारायण राणे- शिवसेना -(धनुष्यबाण), अनंतराज नंदकिशोर पाटकर- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- (पेनाची निब सात किरणांसह), उज्वला विजय येळाविकर- अपक्ष -(शिट्टी) यांचा समावेश आहे.
270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 06 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दिपक वसंतराव केसरकर – शिवसेना- (धनुष्यबाण), राजन कृष्णा तेली- शिवसेना- (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- (मशाल), अर्चना घारे परब- अपक्ष- (लिफाफा), दत्ताराम विष्णू गांवकर- अपक्ष -(शिवण यंत्र), विशाल प्रभाकर परब- अपक्ष -(गॅस शेगडी), सुनिल ऊर्फ यशवंत वसंत पेडणेकर- अपक्ष- (फलंदाज) यांचा समावेश आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.