*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
*सरली दीपावली…..*
दिवाळी बघता बघता संपली..यंदा आठ दिवस दिवाळी म्हणून खूष होतो आपण…पण ते ही दिवस सरले.
आता परत आपापले रूटीन सुरू..पाहुणे परतवणी होते आणि घर खायला उठते.दिवाळी आधी पासून म्हणजे नवरात्र पासून जी दिवाळीची प्राथमिक तयारी असते ती सुरू होते ..गृहिणी कामाला लागतात…धान्य आणणे,भरणे, भाजणी, अनारसा पीठ, करंजी,लाडू, चिवडा…..एक न अनेक प्रकार करायचे,वस्त्रे खरेदी,घर सजावट खरेदी, घर आवरणे, सजवणे .. .. पाहुण्यांची उठबस, आहेर….या सर्वांची तयारी करण्यात घरच्या गृहिणी रमलेल्या होत्या . आता पर्यंत त्यांना उसंत नव्हती….आणि आता घर रिकामे, कामे ही स्थिरावली…त्यामुळे त्या मोकळा श्वास घेताना दिसत आहेत..परत सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसत आहेत…
आम्हा बायकांना सतत कामाची सवय असल्याने…इतक्या मोठ्या सणांच्या नंतर हे रिकामपण पण हवेहवेसे वाटू लागते.
तमाम पुरुष वर्ग बहुदा निवडणुकीच्या गप्पात रंगलेला दिसतो, तर एक ग्रुप पूर्णपणे निष्क्रिय दिसतो…त्याला कारण सध्याची राजकारणाची बिघडलेली परिस्थिती.
सध्या एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे यंदा महागाईमुळे फटाके जास्त उडवता न आल्याने बच्चे कंपनी थोडी हिरमुसलेली दिसली…. नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन या दिवशी म्हणावे इतके फटाके फोडले गेलेले दिसले नाही. ज्या आवाजाने पहाटे 4.30/5ला जाग यायची, ती मजा नाही अनुभवता आली.
असो…आता आले दिवस असेच पुढे सरकत राहतील . आपले छंद आपल्या कामाव्यतिरिक्त जोपासले, तर आला दिवस सत्कारणी लागेल….नाहीतर आपले आयुष्य ही किड्या मुंग्यांप्रमाणे सरळ सोट जाईल… आपला हा जन्म सत्कारणी लावायचाच हा ध्यास घेऊन काही तरी वेगळे करून गुंतून रहाणे उत्तम..उदा… वाचणे, लिखाण, चित्रकला, गायन..वादन …कशात तरी गुंतून घ्यायला हवे…म्हणजे जीवनात आनंद मिळतो…
तर आता दीपावली सरली…तुळशी लग्न सरेल…मग पुढे एवढे सण नाहीत… पाऊस नाही, ऊन नाही..मस्त फिरणे चालू करून, वजन उतरविण्याचा कालखंड ही सुरू होतोय. जून पर्यंत चिंता नाही…..
असो…आता दिवाळी सरली…निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत…खूप मेसेजेस फिरत आहेत….हिंदुत्व हवे असेल तर मतदानास आपण जाणे गरजेचे आहे…आपल्या गावी मतदाना दिवशी हजर राहणे स्वतःला बंधनकारक करा…कारण उद्या वेशीवर भयानक संकट उभे आहे…जागरूक आणि जागृत व्हा…
चलो…अपना टाईम आ गया है….
जी लो अपनी जिंदगी अपनी मर्जी से…
अपने अंदाज से अपनी जिंदगी का मजा ले लो…
हंसी खुशी से अपना टाईम एन्जॉय करो….
आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा…..मस्त रहा..आनंदी रहा…आणि खूष रहा…
परत एकदा म्हणू या …सर्वांना शुभेच्छा…शुभ लाभ..🙏
………………………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर…
5/11/2024