You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिजाऊ पुरस्कार” प्रदान करून कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिजाऊ पुरस्कार” प्रदान करून कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

कुडाळ :

 

कुडाळ मधील मराठा समाज हॉल येथे काल दुपारी 3.00 वाजता “जिजाऊ पुरस्कार” प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

400 वर्षापूर्वी माँसाहेब जिजाऊंनी त्यावेळी समाजाची गरज ओळखून आपल्या रयतेला जुलमातून मुक्त करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला आणि पूर्णत्वास नेला. त्याच जिजाऊंच स्मरण करत आजच्या युगातील समाजाच्या गरजा ओळखून समाजाप्रती आपले कर्तव्य समजून आपल्या कामाच्या/ सेवेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना “जिजाऊ पुरस्कार” देण्यात आला. हा पुरस्कार सिंधुदुर्ग शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय सौ. निलमताई नारायणराव राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 त्यामध्ये सौ.अदिती भूषण बोडस (पडेल), सौ.रंजना रामचंद्र कदम (देवगड), सौ.सुप्रिया समीर पाटील (कणकवली), निशा भास्कर गुरव (कणकवली), सौ. ज्योती गावकर (कडावल), सौ. रेश्मा गुरुनाथ सावंत (कुडाळ तेडोली), सौ. प्रिया पांचाळ (पिंगुळी कुडाळ), श्रद्धा केळुसकर (मालवण), कु. रुचिता नार्वेकर (मालवण), नेत्रा मुळ्ये (सावंतवाडी), सुजल सूर्यकांत (गवस दोडामार्ग), सौ. सुजाता देसाई वेंगुर्ला आदी कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर उपस्थित भगीरथ प्रतिष्ठानच्या डॉ. हर्षदा देवधर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. समिधा नाईक, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती सौ. माधुरी बांदेकर, देवगड नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, भाजपा जेष्ठ नेत्या सौ. अस्मिता बांदेकर, कुडाळ प.स सभापती सौ. नुतून आईर, जेष्ठ नेत्या नेत्राताई मुळ्ये  उपस्थित होत्या. 

तसेच या कार्यक्रमास सुषमा खानोलकर, जेष्ठ नेत्या नगरसेविका उषा आठल्ये, कणकवली नगरसेविका मेघा गांगण, ओबीसी मोर्चा अध्यक्षा सौ. दिपलक्षमी पडते, कुडाळ उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, नगरसेविका साक्षी सावंत, कुडाळ शहराध्यक्ष महिला ममता धुरी, सौ. आदिती सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य चोरगे मॅडम, वेंगुर्ला महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्मिता दामले, कणकवली नगरसेविका प्रतीक्षा सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रार्थना हळदणकर, उष्णकला केळुस्कर देवगड तालुका अध्यक्ष, वेंगुर्ले नगरसेविका श्रेया मयेकर, जिल्हा चिटणीस लक्ष्मी आरोनदेकर, कुडाळ महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आरती पाटील, सरोज जाधव, प्राची तावडे, पिंगुळी महिला भाजपा अध्यक्ष साधना माडये, जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या असंख्य महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थिती होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी केले तर प्रस्तावना प्रियंका नाईक यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 19 =