सावंतवाडी :
मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावलीच्या औचित्य साधून,मळेवाड जंक्शन येथील व्यापारी,दुकानदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केसरकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी, दुकानदारांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या सोबत, माजी पंचायत सदस्य सीताराम (बाळा) शिरसाट, लाडोबा केरकर, मळेवाड विभाग प्रमुख अमित नाईक, विभाग प्रमुख शंकर नाईक, योगेश नाईक, सरपंच श्रावणी नाईक, धाकोरे सरपंच रोहिणी मुळीक, आरोस उपसरपंच प्रसाद नाईक, संगम पांगम, तानाजी खोत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.