कुडाळ :
रविवार दि. २७ ऑक्टोबर २४ रोजी रामेश्वर वाचनालय, अणाव-कुडाळ येथे संपन्न झाला. यावेळी जयवंत दळवींच्या “महानंदा” या कादंबरीवर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लेखिका कल्पना मलये होत्या.
अणाव येथे कार्यक्रमासाठी आजगाव मधून एकूण चौदा साहित्य रसिक, साहित्यिक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने शेखर पणशीकर, डाॅ. गणेश मर्ढेकर, स्नेहा नारींगणेकर, सिंधु दिक्षित, अनिता सौदागर, एकनाथ शेटकर, सोमा गावडे आणि दिलीप पांढरे होते. विशेष म्हणजे १५ वर्षाचा मिहीर नाईक व ७८ वर्षाच्या सरोज रेडकर देखील आवर्जून कार्यक्रमासाठी सोबत आल्या होत्या. अविनाश जोशी व सचिन दळवी यांनी सदर कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था केली होती.
सुरूवातीला पणदूरच्या संविता आश्रमाला भेट दिली. तेथे १७२ बांधव(मुले,स्त्री पुरुष) वास्तव्याला आहेत. सचिन दळवीच्या पुढाकाराने संविता येथील बांधवांना १८० पुरणपोळ्या तसेच अनिल निखार्गेंच्या पुढाकारातून दिवाळीचा फराळ भेट दिला. संविताचे संदिप परब यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.
विनय सौदागर:
9403088802