You are currently viewing म्हापण येथील गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी

म्हापण येथील गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी

म्हापण येथील गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी*

धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले

म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरातील प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रोत्सव ९ एप्रिल रोजी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांसह साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेला सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर व अन्य विविध भागातून भाविकांची मोठी उपस्थिती असते.श्री देवी शांतादुर्गा देवस्थात ट्रस्टच्यावतीने गुढीपाडवा यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गुढीपाडवा या नववर्षाच्या दिवशी भाविकांचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गावकरी व ईर्तिक मंडळींच्या उपस्थितीत जामदार खात्यातून उत्सवमूर्ती काढण्यात येतील. सकाळी १० वाजल्यापासून देवीची ओटी भरणे, ११ वाजता पंचांग वाचन, दुपारी १२.३० वाजता दादरा धार्मिक पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता शांतादुर्गा मंदिराकडून श्री देवी माऊली मंदिर पाट येथे ‘खळा’ नेणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ७.३० वाजता इंगळे न्हाणे व अन्य कार्यक्रम होतील. रात्री १२ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व नंतर रात्री १ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन गुढीपाडवा यात्रेसाठी येणाऱ्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या जागा निश्चितीसाठी ७ व ८ एप्रिल ‘दरम्यान शांतादुर्गा मंदिराकडे येऊन जागा निश्चित करावी, असे आवाहन शांतादुर्गा, श्री देव खवणेश्वर, श्री सिद्धेश्वर व श्री ब्राम्हणदेव देवालय ट्रस्ट (म्हापण) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*एसटी बसची सोय* या यात्रेसाठी म्हापण येथे जाण्यासाठी कुडाळ, वेंगुर्ले व मालवण या तिन्ही आगारातून एसटी बसची सोय करावी, अशी मागणी देवस्थान कमिटीने सदर आगार प्रमुखांकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी एसटी बस सेवा उपलब्ध असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा