You are currently viewing गडनदी पुलानजीक केमिकलवाहू ट्रक कलंडला

गडनदी पुलानजीक केमिकलवाहू ट्रक कलंडला

गडनदी पुलानजीक केमिकलवाहू ट्रक कलंडला

कणकवली

गोव्याहून भिवंडी येथे जात असलेला आयशर टेम्पो (एमएच ४६ बीएम ७१०१) मागील पाटा तुटल्याने महामार्गाच्या बाजूला कलंडला. हळवल फाटा येथील वळणावर शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात कुणीही जखमी नसले तरी टेम्पोचे मोठे नुकसान झाले. हा टेम्पो एका कंपनीच्या रासायनिक द्रव्याची वाहतूक करत होता व त्याचे अनेक भरलेले ड्रम टेम्पोमध्ये होते. अपघातानंतर काही ड्रम महामार्गावर पडले. परिणामी, त्यातील द्रव्य महामार्गावर पडल्याने हा भाग निसरडा बनला होता. पोलिसांनी त्यावर माती टाकून दुचाकी वगैरे घसरू नये, याची खबरदारी घेतली. तर टेम्पोचालक विलास नारायण इंगवले (५४, तळेजा-रायगड) यांच्या खबरीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 6 =