*भांडुप मतदार संघातून मनसेची पक्षाचे नेते श्री शिरीष गुणवंत सावंत यांना संधी.*
*ढोल ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते तथा भांडूपकरांच्या साथीने मोठ शक्ती प्रदर्शन करत भांडूप मधून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल.*
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अत्यंत शांत आणि संयमी नेतृत्व कोकणचा सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळगाव वेंगुर्ला तालुक्यातील अणसुरपालचे श्री शिरीष सावंत यांनी आज सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडुप मतदार संघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
लाला शेठ कंपाऊंड ते निवडणूक कार्यालय अशी भव्य रॅली काढत मोठे शब्द प्रदर्शन करण्यात आले. यावेळी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते व सोबत मूळ कोकणी भांडुपकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.