You are currently viewing तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करा

तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करा

आम. नितेश राणेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कणकवली

कणकवली तालुक्यात तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करण्याची मागणी आ. नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देवगड तालुक्यातील बहुतांश भूभाग खाडीकिनारी वसलेला आहे.भरती च्या खारे पाणी खाडीमार्गाने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसुन आर्थिक नुकसान होते. याबाबत उपाययोजना करण्यासाठी देवगड तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना 40 ते 50 किलोमीटर दूर असलेल्या कणकवली तालुक्यातील तळेरे येथील खारलँड विकास विभागाच्या कार्यालयात यावे लागते. देवगड तालुका आणि तळेरे येथील 50 किमी अंतरावर असलेल्या खारलँड विकास विभाग कार्यालयामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कणकवली तालुक्यात खारजमीन अत्यल्प असून तळेरे येथे खारलँड कार्यालयाची गरज नाही. तळेरे येथील खारलँड ऑफिस देवगड ला हलविण्यास कोणाचा विरोधही नाही. हे ऑफिस तळेरे मधून स्थलांतरित करण्याची देवगड तालुकावासीयांचीही अनेक वर्षांपासून मागणी आहे. हे ऑफिस देवगडला स्थलांतरित करून देवगड तालुकावासीयांची मागणी पूर्ण करावी असे आमदार नितेश राणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + two =