वैभववाडी
शिवसेना पक्षांमध्ये वैभववाडी शहरातील सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, दिगंबर पाटील, संदेश पटेल,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, रमेश तावडे, आर.बी .जाधव, दीपक पांचाळ, अशोक रावराणे, विठ्ठल बंड, स्वप्नील धुरी, डॉ.प्रथमेश सावंत, अतुल सरवटे आदी मान्यवर उपस्थित होते. कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यांमध्ये वातावरण शिवसेनामय झाले आहे. येत्या काळात वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात द्या त्यानंतर विकास कसा होतो ते पहा. कणकवली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या तिन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येणार आहे. देवगड तालुक्यातील 60 ते 70 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेकडे येणार आहेत. वैभववाडी तालुक्यातील 70 ते 75 टक्के ग्राम पंचायती शिवसेनेच्या ताब्यात द्या, तुम्हांला विकासाची हमी देतो. खा.विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली. यावेळी नितेश मोरे, प्रकाश पवार, संतोष पवार, सेजल पवार, मानसी मनोज सावंत, अनिता करकोटे, पवित्रा निकम, बाबा चव्हाण, संजय गुरखे अशा वैभववाडी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.