You are currently viewing महिला मंडळ कुडाळ व ग्रामपंचायत होडावडा येथे महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

महिला मंडळ कुडाळ व ग्रामपंचायत होडावडा येथे महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

कुडाळ

महिला मंडळ कुडाळ व ग्रामपंचायत होडावडा येथे आज दि. 18.10.2022 रोजी कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ यांच्या मार्फत महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास होडावडा ग्रामपंचायत सरपंच मा.सौ.अदिती नाईक मॅडम, CLF व्यवस्थापक सौ.तनुजा परब मॅडम, CRP सौ.अमिता पेडणेकर, कौंटुबिक सल्ला व मार्गदर्शन कुडाळ केंद्राच्या सल्लागार व कार्यक्रमाच्या मार्गदर्शक श्रीमती करिष्मा परब मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी गावातील महिला उपस्थित होत्या. महिलांना केंद्राच्या कामकाजा विषयीं माहिती दिली व कौटुंबिक हिंसाचार कायदा अधिनियम 2005 विषयीं कायद्यातील तरतुदी व त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचं बरोबर POCSO कायदा 2012 विषयी माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा