You are currently viewing मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईत तारकर्लीत अवैधरित्या मासेमारी करणारा मलपीतील ट्रॉलर पकडला…

मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईत तारकर्लीत अवैधरित्या मासेमारी करणारा मलपीतील ट्रॉलर पकडला…

मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईत तारकर्लीत अवैधरित्या मासेमारी करणारा मलपीतील ट्रॉलर पकडला…

कठोर कारवाई करण्स्थायाची स्थानिक मच्छीमारांची मागणी…

मालवण

सागरी किनारपट्टीवरील मालवण तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने आज पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला आहे.पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलर मध्ये मोठ्या प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेटी येथे आणण्यात आला आहे.

१९ ऑक्टोबर २०२४ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक आयएनडी- केए- ०२ एमएम – ५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. ही नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे.
मलपी येथील ट्रॉलर्स ने घुसखोरी करत मासळीची लूट केली जातं असल्याचे कळताच मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली. अन्यथा आम्ही समुद्रात उतरू असा इशारा दिला. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने कारवाई करत मलपी येथील ट्रॉलर पकडण्याची कारवाई केली.
मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्या वेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तर अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भुमिका संतप्त मच्छिमारांनी मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा