You are currently viewing वेंगुर्लेच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांची नियुक्ती

वेंगुर्लेच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांची नियुक्ती

वेंगुर्ला :

 

वेंगुर्लेच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावर आज अतुल जाधव यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वेंगुर्ले वासीयांकडून स्वागत करण्यात आले.

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक तानाजी मोरे हे ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्री. जाधव यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बदली केली. त्यानुसार श्री. जाधव यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा आज चार्ज स्वीकारला. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी त्याचे स्वागत केले.

“आम्ही वेंगुर्लेकर” शिष्टमंडळाने आज नूतन पोलीस निरीक्षक जाधव यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये वेंगुर्लेत सुरू असलेल्या अमली पदार्थांवर आळा घालण्या बाबत चर्चा झाली. त्यावर याला आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन बनवतो व कारवाई करतो असे आश्वासन पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी दिले. यावेळी ॲड. सुषमा प्रभुखानोलकर, नंदन वेंगुर्लेकर, वसंत तांडेल, इर्शाद शेख, प्रा.सचिन परुळकर, दाजी नाईक, प्रदीप सावंत, सत्यवान साटेलकर, प्रताप गावसकर, वामन कांबळे, महेश राऊळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा