You are currently viewing नारकोटिक्­स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी व्यवस्थापकासह तिघांना अटक

नारकोटिक्­स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी व्यवस्थापकासह तिघांना अटक

 

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नारकोटिक्­स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवत आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनंतर या प्रकरणात आता एनसीबीने अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. दियाचा माजी व्यवस्थापक रहिला फर्नीचरवालासह त्याची बहिण आणि एका ब्रिटीश नागरिकाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एनसीबीने २०० किलोग्रॅम गांजाही जप्त केला आहे.

 

एनसीबीने एका ब्रिटिश व्यावसायिक करण सजदानीलाही अटक केली आहे. दोन्ही बहिणी ड्रग्स व्यवसायात त्याची मदत करत असल्याचा आरोप आहे. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे वेस्टमध्ये एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला आहे. याच दरम्यान करण सजदानीच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. यानंतर रहिला फर्नीचरवालाकडे चौकशी करण्यात आली. यात तपासात रहिला फर्नीचरवाला आणि त्याच्या बहिणीकडून गांजा जप्त करण्यात आला.

दरम्यान, यापूर्वीही बॉलिवूड ड्रग्ज कनेक्­शन प्रकरणी एनसीबीकडून अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. यात दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान, अर्जुन रामपाल यांचा समावेश आहेत. गांजा बाळगण्याप्रकणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =