You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात तळवडे व माडखोल येथे दोघांचा आकस्मिक मृत्यू

सावंतवाडी तालुक्यात तळवडे व माडखोल येथे दोघांचा आकस्मिक मृत्यू

सावंतवाडी तालुक्यात तळवडे व माडखोल येथे दोघांचा आकस्मिक मृत्यू

सावंतवाडी

तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत तळवडे व माडखोल येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील तळवडे-मिरीस्तेवाडी येथील संजय गणेश कामत (वय ५२) यांचे झोपेतच निधन झाले आहे. ते गावातील एका मंदिराच्या मंडपातील कठड्यावर झोपले होते. मात्र ते सकाळी उठले नसल्यामुळे गावातील लोकांनी पोलिस पाटील धोंडी जाधव यांना माहिती दिली. यावेळी त्यांची तपासणी केली असता ते जागीच मृत झाल्याचे दिसून आले. तर दुसरी घटना माडखोल येथे घडली आहे. धवडकी येथील श्रीकृष्ण चाफेकर (वय ६०) यांना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात नेण्यात येत होते. परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूची कारणे समजू शकली नाहीत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अमंलदार रामदास जाधव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा