कणकवली :
महिला पतंजली योग समिती, कणकवली तर्फे १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत कणकवलीत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील सुहास वरुणकर यांच्या ‘अद्वैत’ या निवासस्थानी दोन सत्रात हे शिबीर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन १९ रोजी सायंकाळी ४.३० वा. होणार आहे. शिबीर रोज सायंकाळी ५ ते ६.३० आणि सकाळी ६ ते ७.३० या वेळेत होणार आहे. अधिक माहिती व सहभागासाठी ९५४५०१२३७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला पतंजली योग समिती, कणकवलीतर्फे करण्यात आले आहे.