सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!
सुरक्षित व विश्वासाचे वातावरण ठेवून निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडू
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल
सिंधुनगरी
निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी व निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची करडी नजर आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 78 आरोपींचा शोध सुरू आहे तर 9 आरोपी फरारी असून त्यांच्याही शोधावर पोलीसआहेत. जिल्ह्यात 798 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयीतान विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात आली असून यातील काही जणांवर हद्दपदीची कारवाई होणार आहे अशी माहिती सिंधूचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी दिली.
निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक भवनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलमाखाली या जिल्ह्यात 798 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात जिल्हा पोलीस दलाने प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. यातील काही व्यक्तींविरोधात या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई केली जाईल. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.