You are currently viewing जिल्हा भंडारी महसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जिल्हा भंडारी महसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय(पेडणेकर हॉल येथे महासंघाचे अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, सरचिटणीस राजू गवंडे, कार्याध्यक्ष रमण वायंगणकर, भंडारी माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, अखिल भारतीय भंडारी राष्ट्रीय अध्यक्ष नाविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा सदस्य रुपेश पावसकर, समील जळवी, प्रकाश पावसकर, दर्शन कुडव, देवगड तालुका अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, एकनाथ टेंबकर राजन कोरगावकर, भाई कांबळी, गजानन वेंगुर्लेकर शरद पावसकर, अशोक मालवणकर, भालचंद्र मसुरकर, उल्हास हळदणकर, प्रमोद मोबारकर, श्री.विकास वैद्य, सुनील नाईक, प्रदीप मुणगेकर, विलास करंजेकर, सत्यवान साटेलकर, बाबी चिपकर, आळवे गुरुजी, लक्ष्मीदास मुंडीये, जयप्रकाश चमणकर,अनुप नाईक अन्य समाज बांधव उपस्थित होते. जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्ग या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत महासंघ अध्यक्ष अतुल बंगे यांनी प्रस्ताविक केले. तर, जिल्ह्या सचिव राजू गवंडे यांनी मागील सन ३०/०९/२०१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृतांत वाचून दाखवत, सन २०१९-२०२० च्या वार्षिक जमाखर्च वाचून मंजूर करण्यात आला.तर सन २०२०-२०२१ च्या अंदाजपत्रकास मान्यता आली.सन २०१९-२०२० च्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून सन २०२०-२०२१ च्या सालाकरीता शासकीय प्रमाणीत लेखापरीक्षकाची नियुक्ती करुन आणि मानधन अदा करणे,यासंदर्भात चर्चा जनरल सभेत करण्यात आली.तसेच नवीन सभासद नोंदणी व कारणे आणि शिक्षण व आरोग्यसाठी समाजाकडून फंड जमा करणे याचे या सभेत नियोजन करण्यात आले.तसेच भंडारी महासंघा चे राष्टीय अध्यक्ष नाविनचंद्र बांदिवडेकर यांची कर्नाटक भंडारी समाज सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल बांदिवडेकर यांचे जिल्हा महासंघाकडून अभिनंदन करण्यात आले.आणि भंडारी समाज बांधव जे अनंतात विलिन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भंडारी महासंघाची ही सभा महाराष्ट्र शासन कोविड-२०१९ च्या नियमानुसार घेण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + twelve =