You are currently viewing उद्या संजय लाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

उद्या संजय लाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सावंतवाडी :

 

मालवण राजकोट मालवण येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच कोलमडून पडणे ही जिल्ह्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सदर पुतळा उभारणीच्या कामात दुर्लक्षासह भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे ज्या शासकीय यंत्रणेमार्फत पुतळ्याचे काम करण्यात आले. त्या संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा माडखोल माजी सरपंच संजय लाड यांच्यासह शिवप्रेमींनी दिला आहे. याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात संजय लाड म्हणतात, शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होऊन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत लोकशाही मार्गाने प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार भारतीय घटनेत प्रत्येक नागरीकाला नाही का? तसेच वाहन चालवत असताना अपघात होवून मृत्यु झाल्यास अपघातास कारणीभूत व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जातो. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात अपघातास जबाबदार व्यक्ती व संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल का करण्यात येवू नये, असा सवाल व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा