शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही….

शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही….

प्रमोद कामत यांचा दांडेलीत विरोधकांना इशारा; भाजप पक्ष उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा

बांदा

आम्ही पक्षाचे सेवक आहोत. दांडेलीतील आमच्या उमेदवारांचा फॉर्म भरताना शिवसेनेने उमेदवारांवर दबाव आणला होता. परंतु आम्ही कुणाच्याही धमकीला भीक घालत नसून प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचे आव्हान, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी विरोधकांना दिले आहे. दांडेली येथे आमदार आशिष शेलार यांच्या गावभेट दौऱ्यात श्री. कामत बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, सावंतवाडी युवामोर्चा चिटणीस काका परब, दांडेली बुथ अध्यक्ष संदिप माणगावकर, मनसेचे अमित नाईक तसेच अमोल आरोसकर, सिद्धेश मालवणकर, देवेंद्र माणगावकर, राकेश दळवी, रसिक दळवी, दुर्गेश मोरजकर, कृष्णा पालयेकर, सुनिल परब आदी ग्रामस्थ व उमेदवार उपस्थित होते. ज्या प्रकारे बांदा ग्रामपंचायच्या निवडणुकीवेळी आम्ही नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला त्याच प्रकारे दांडेली-आरोस या दोन्ही गावांतही दिलेला शब्द पूर्ण करणार. बांदा पॅटर्न दांडेली व आरोस गावात वापरून शिवसेनेची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार प्रमोद कामत यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा