You are currently viewing राजन तेली उबाठा शिवसेनेतून लढणार; चर्चेला पूर्णविराम

राजन तेली उबाठा शिवसेनेतून लढणार; चर्चेला पूर्णविराम

*राजन तेली उबाठा शिवसेनेतून लढणार; चर्चेला पूर्णविराम*

*अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय*

*भाजपा पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच यांची लक्षणिय उपस्थिती*

*सावंतवाडीत राजन तेली यांचा पदाधिकारी यांचा मेळावा*

माजी आमदार राजन तेली उबाठा शिवसेनेतून सावंतवाडी विधानसभा लढणार, या चर्चेला सोमवारी पूर्णविराम मिळाले. तेली हे भाजपा सरपंचांच्या,पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले.
राजन तेली यांनी सोमवारी भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
पदाधिकारी यांच्या मनोगतात कमळ निशाणी वरच सावंतवाडी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, संधी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूकिला सामोरे जायचे आहे. राजन तेली हेच आमचे उमेदवार असा सुर निघत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा