सावंतवाडीतील “शिल्पग्राम रिसॉर्टची” अज्ञातांकडून नासधूस…

सावंतवाडीतील “शिल्पग्राम रिसॉर्टची” अज्ञातांकडून नासधूस…

सावंतवाडी

शिल्पग्राम हॉटेलची समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली. त्या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नगरसेवक उदय नाईक यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा लोकांना पाठीशी घालणे ही दुर्दैवी बाब आहे‌. या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवू संबंधित हॉटेल मालकाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

काल रात्र पार्टीच्या नावाखाली हॉटेलच्या मॅनेजरशी वाद घालून सुरक्षा रक्षकाच्या केबिन च्या काचा फोडून तसेच कुंडी फेकून मारून परिसरात धिंगाणा घातला. सामानाची नासधूस केली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,अशोक पवार, माजी नगरसेवक सुरेश भोगटे , नगरसेवक बाबू कुडतरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुंडलिक दळवी यांनी हॉटेलमालक दळवी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नाही असे सांगितले.

पुंडलीक दळवी यांनी घडलेली घटना मालकांच्या कानी घातली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरात यापूर्वी अशा घटना संबंधित व्यक्तींकडून घडल्या आहेत, एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्यामुळे अशा घटना व दादागिरी होत असेल तर आपण त्या विरोधात उभे राहू. शांत सुसंकृत शहरात अशा घटना पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली जाईल असं ते म्हणाले. ज्या वेळी शिल्पग्राम बंद होते व ते चालवायला द्यायचे होते त्यावेळी मी चालवायला घेणारे दळवी यांना शब्द दिला होता. तुम्ही हे हॉटेल आकर्षक बनवा पर्यटकांना यांची भुरळ पडली पाहिजे तुमच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन त्याच कर्तव्य भावनेतून ही घटना समजल्यानंतर आज या ठिकाणी आपण आलो असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

यापुढे भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली जाईल ,ज्याने ही घटना केली ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. त्याने केलेली शिवीगाळ हॉटेल मध्ये केलेली मोडतोड हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे तसेच नगराध्यक्ष संजू परब यांनी या घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते असे साळगावकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा