You are currently viewing रंग जांभळा

रंग जांभळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*रंग जांभळा*

 

अत्यंत आकर्षक असणारा हा रंग निसर्गात तसा दुर्मिळ च आढळतो.

फुलांमधे मात्र तो विविध छटांमधे खुलून येतो…

.गवतावरची इवलीशी जांभळी,पिवळी,गुलाबी फुलं हिरव्यागार गवतावर आकर्षक दिसतात.

परदेशात जांभळ्या रंगाची गडद,फिक्कट रंगाच्या फुलांनी भरगच्च ,बहरलेली झाडे ..रस्त्याच्या दुतर्फा दिसतात..

ते दृश्य मन वेधून घेतं….लवेंडरचे तुरेही जांभळ्या रंगाचेच येतात.

वस्त्रांमधे जांभळा शालू,पैठणी व त्यावर जरतारी विणकाम,किंवा मोर खुलून दिसतात.

जांभळ्या रंगाची प्रत्येक छटा अतिशय सुंदर दिसते.आकाशात संध्याकाळी अनेक रंगात तोही उठून दिसतो,आणि इंद्रधनूतही ऊनपावसात दृष्टीस पडतो.

पौष्टिक रानफळात जांभळं ,रानबोरं करवंद किती तरी प्रकार…..

जांभळा रंग शोधक आणि शांतताप्रियही आहे.

जांभळा रंग मनाची स्थिती सुधारण्यास मदत करतो. तसेच मनातील भीतीवरही मात करतो ….

असा हा सौंदर्याचं लेणं व अत्यंत आकर्षक जांभळा रंग

खूप नेत्रसुखद आहे…….!

 

💜💜💜💜💜💜💜

 

लेखन…अरुणा दुद्दलवार✒️🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा