You are currently viewing पावशी ग्रामपंचायतीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पावशी ग्रामपंचायतीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ :

 

पावशी ग्रामपंचायत येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर संघर्ष मित्रमंडळ-पावशी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संघर्ष मित्रमंडळाकडून पणदूर येथील संविता आश्रमास धान्य वाटप करण्यात आले. मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरास पावशी गावचे सरपंच बाळा कोरगावकर, माजी सरपंच पप्या तवटे, माजी सदस्य संजय कोरगावकर, सदस्य वैशाली पावसकर, शिल्पा खोत, चंद्रकांत कुंभार, कृणाल कुंभार आदी उपस्थित होते.

 

तसेच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, कॉन्स्टेबल ओंकार पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, ओबीसी कुडाळ शहर अध्यक्ष राजू गवंडे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच संघर्ष मित्रमंडळ-पावशी यांच्याकडून पणदूर येथील संविता आश्रमास तांदूळ, तूरडाळ, साखर, तेल आदी किराणा माल साहित्य रूपात देणगी म्हणून दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा