कुडाळात सिंधूरत्न योजनेंतर्गत ७२२ शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप…
कुडाळ
सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत कुडाळ तालुक्यातून १ हजार ३७९ शेतकर्यांनी ताडपत्रीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. या सर्व शेतकरी अर्जदारांच्या लॉटरी सोडत पध्दतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामधील मंजुर ७२२ शेतकर्यांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले. तर ६५७ शेतकरी ताडपत्रीच्या प्रतिक्षेत असुन शासनाकडून अनुदान उपलब्ध होताच या सर्व शेतकर्यांना प्राधान्याने ताडपत्री वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कुडाळ येथील तहसिल विभागाच्या समोरील कृषी कार्यालयात कुडाळ तालुका कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉटरी सोडत पध्दतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुडाळ मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे कडावल मंडळ अधिकारी रविंद्र कोळी, माणगाव मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली आदिसह कृषी सेवक, कर्मचारी उपस्थित होते.