You are currently viewing निळा रंग

निळा रंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*७) निळा रंग*

 

प्रदूषणमुक्त नीलांबर

दुर्मिळ होतसे दर्शन

नैसर्गिक निळा निसर्गात?

हिरवा+पिवळा मिश्रण

 

पेनामधली निळी शाई

इतिहासजमा झाली

बॉलपेन, जेल पेन

सहीपुरती उरली

 

मयुराचे थुईथुई नर्तन

फुलवून निळा पिसारा

भान हरपून ‘फक्त’ बघावा

मनमोहक नजारा

 

कौरव-पांडवांचे पुष्प

कृष्णकमळाला म्हणती

गोकर्ण / अपराजिता

नीलकंठास वाहती

 

इतर रंगांसवे सहजच

वसे कमानीत इंद्रधनुच्या

अशोकचक्र विराजतं

हृदयस्थानी तिरंग्याच्या

 

सौम्य, शीतल, सुंदर

नीलमोहराचा साज

साद घाली गूढ गंभीर

निळ्या सागराची गाज

 

सावळे प्रभु रामचंद्र

श्रद्धास्थान भक्तजनांचे

घननिळा मुरलीधर

दैवत गोपगोपिकांचे

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

९-१०-२४

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा