You are currently viewing स्मृति भाग ३६

स्मृति भाग ३६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य. भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३६* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज मी समग्र भारत वर्षातील माता भगिनींची माफी मागून एक विशेष गोष्ट सांगत आहे . आज ही बर्‍याच खेड्यात घरात मूल जन्माला आलं की घरातली म्हातारी आजी अंघोळ घालण्याचं काम करते !! ती आईबरोबर मुलालाही मांडीवर घेवून अंघोळ घालायची . तो मुलगा अंगणात खेळू लागेपर्यंत व नंतरही काही दिवस म्हणजे पाच सहा वर्षाचा होईस्तोवर ती अंघोळ घालायची ! बादलीत एक मग्गा पाणी शिल्लक ठेवायची व म्हणायची ” झाssली अंघोळ !! ” मुलगा समजायला लागल्यावर विचारायचा , ” आजी , पाणी शिल्लक राहिलं की ?? ” तेंव्हा आजी म्हणायची , ” अरे , असं पाणी उरवलं ना की मामा श्रीमंत होतो !! ” आणि हसायची ! मी मोठा झाल्यावर आयुर्वेदाला गेलो . पुढे प्रॅक्टीस सुरु केली . पण जेंव्हा समाजात HIV ( एडस् ) पसरला , तेंव्हा नियमांचा विचार करता करता विचारांचा काटा एकदम आजीबाईंच्या वागण्यावर थांबला आणि आमच्या पूर्वजांचे समजावून सांगण्याच्या पद्धतीचा गर्वच वाटतोय आजतागायत !!! आयुर्वेद असं सांगतं की अंतर्वस्त्राशिवाय अंघोळ करणे चूक आहे . मग ती जी पाणी उरवण्याची पद्धत होती ती , तेवढ्या पाण्याने रोज गुह्येंद्रिय साफ करावं , ही सूचना त्यात होती . तीच आजी लहान बाळाच्या अंगाला तेल लावायची व अंगणातल्या खाटेवर उन्हात टाकून द्यायची . कुणी विचारलं तर सांगायची , असं टाकलं ना की पोरांची हाडे भरतात ! ” तिला सूर्याच्या कोवळ्या उन्हात “डी” जीवनसत्व असते ! हे नव्हतं सागता येत . पण काळजी अशी घ्यायची की तब्बेत उत्तमच राहिली पाहिजे !! तिला सायन्सच्या भाषेत उत्तर देता येत नव्हतं , पण तिच्या रक्तात ते होतं !!

भारत चीन युद्धाचे वेळेस महाराष्ट्रातून यशवंतरावजी चव्हाण केन्द्रात नेहरुंचे मदतीला गेले होते . त्यावेळेस वर्तमानपत्रात ओळ होती ” सह्याद्री हिमालयाचे मदतीला धावला ” ही ओळ पाचहजार वर्षानंतर वाचली तर एखादा सांगेल ” आमच्याकडे पाचहजार वर्षापूर्वी पर्वत चालत होते ! ” अशाच गोष्टी ऋषिप्रणित वाङ्मयाबाबत घडतात !!! ते काय सांगत होते हे जाणण्याचा प्रश्नच कुणी केला नाही या हजार वर्षात ! यात भर घातली आमच्या राजकारण्यांनी !! जे शिकवायला हवं ते न शिकवल्याने जगातले सगळे देश धार्मिक वा धर्माधारित आणि भारतात *धर्मनिरपेक्षतेचा आतंक !* किती घाण करुन ठेवली यांनी ! मला ऋषिंनी सांगितलेले सारे आवडते व न समजलेले मी शोधण्याचा प्रयत्न करतो . माझ्यापेक्षा कितीतरी बुध्दिमान भारतात आहेत . सर्वांनी प्रयत्न केला तर आम्हाला ” भारत मातेचा सपूत ” अशी उपाधी गर्वाने नाही लागणार ?? असो .

पुन्हा प्रश्न उभा राहतोच ! ऋषि वाईट असतील ? सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? उद्या काही श्लोक पाहू .🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा