You are currently viewing सावंतवाडी तालुका एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुख पदी आबा सावंत यांची नियुक्ती

सावंतवाडी तालुका एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुख पदी आबा सावंत यांची नियुक्ती

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार उबाठा संघटनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुख पदी माजगाव माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटी संचालक तथा उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख श्री आबा सावंत यांची एसटी कामगार संघटनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुख पदीची नियुक्ती एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक यांनी उबाठा सेनेचे जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केली.

आबा सावंत हे सर्वांना एकत्रितपणे घेऊन संघटनेचे काम प्रामाणिकपणे करून संघटनेला उभारी देण्याचे काम नेहमीच करतात आणि त्यांच्या जवळ संघटन कौशल्य असल्याने एसटी कामगार संघटनेला नक्कीच उभारी देऊन एसटी चालक वाहक कर्मचारी यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देतील यात शंका नाही अशी आशा जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर समन्वयक बाळा गावडे यांनी संघटनात्मक संरचना यावर मार्गदर्शन केले व खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकत्रित काम करून एसटी कामगार संघटनेच्या कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याचे काम करून संघटना मजबूत करून वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

तर आबा सावंत यांनी आपण पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून शिवसेना नेते तथा खासदार श्री विनायकजी राऊत साहेब, उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरूण भाई दुधवडकर साहेब जिल्हाप्रमुख संजयजी पडते, जिल्हा समन्वयक बाळाजी गावडे, एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्री शैलेशजी परब यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिकपणे काम करून एसटी कामगार संघटनेच्या कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवून न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन अस मत व्यक्त केले.

यावेळी अमित आडके यांची आगार अध्यक्षपदी निवड केली यावेळी एसटी कामगार संघटनेचे जिल्हा सचिव आबा धुरी, विनोद ठाकूर व एसटी कामगार संघटनेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी अनेक चालक वाहक कर्मचारी यांनी उबाठा सेनेच्या कामगार संघटनेमध्ये प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा