You are currently viewing बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सौ.अर्चनाताई घारे परब यांनी केले सांत्वन

बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सौ.अर्चनाताई घारे परब यांनी केले सांत्वन

*आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर करणार पाठपुरावा; कुटुंबीयांना दिला दिलासा*

 

निवती समुद्रात बोट दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आनंद पराडकर, भाऊ येरागी, बोट मालक आनंद धुरी यांच्या कुटुंबीयांचे राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय नेत्या सौ. अर्चना घारे परब यांनी सांत्वन केले. शासन स्तरावर या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करेन असा दिलासा यावेळी सौ अर्चना घारे परब यांनी दिला.

यावेळी निवती सरपंच अवधूत रेगे, पोलीस पाटील जोगेश सारंग, गोविंद जाधव, परेश सारंग, रामा भगत, राष्ट्रवादीचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा