शॉक लागून युवकाचे निधन….

शॉक लागून युवकाचे निधन….

बाहेरचावाडा येथील दुर्घटना : परिसरावर शोककळा

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील एका युवकाचे वेल्डिंगचे काम करताना विजेचा शॉक लागून निधन झाले आहे. आकीत फजल मीर (२७, रा. बुरानगल्ली मोगल आवाट, बाहेरचावाडा) असे त्या युवकाचे नाव आहे. उभाबजार परिसरात एका इमारतीवरील पत्र्याच्या शेडचे काम करताना ही दुर्घटना घडली. त्याच्या हातातील पाईप ओढताना वीज वहिनीच्या मेन लाईनला पाईपचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्याने त्याचे निधन झाले.

अपघातानंतर त्याला रुग्णालयामध्ये आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे त्याच्या निधनामुळे बाहेरचा वाडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा