पुणे :
साहित्य सम्राट पुणे या संस्थेने आपल्या मराठी भाषेला अभिजीत दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मंगलसेन बहल विरूंगुळा केंद्र पिंपरी येथे १९३ व्या साहित्यिक कार्यक्रमात हास्य कवी संमेलन डॉ. प्रमोद लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विचारपीठावर क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष मा.डॉ.प्रमोद लाड, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज मा. अरविंद गुजर, सेवाभावी उद्योजिका मा.हिराताई औटे, अभिरुची हॉटेल उद्योजक मा.प्रदीप पवार आणि साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ उपस्थित होते.
भारतीय संविधान ग्रंथ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. मराठी भाषा ही बाराव्या शतकापासून संत, पंत आणि तंत या परंपरेतील महामानवांनी जतन करून ठेवली. त्यामुळेच आपल्या मातृभाषेला अभिजात भाषा दर्जाने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या मराठी मनांचे, प्रेमिकांचे, रसिकांचे, कलावंतांचे, साहित्यिकांचे आणि समूहांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. असे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष अष्टुळ आपले विचार व्यक्त केले.
यावेळी समाजामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजहित जोपासणाऱ्या मा.संजय बेंडे, मा.सतीश जाधव आणि दिपाली भवाळ यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मा.उमाकांत मिटकर यांच्या डिवाइन जस्टीस आणि मा. राजेश दिवटे यांच्या शेतकऱ्यांचा सेवक या ग्रंथांना राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुजर म्हणाले की जी माणसे आज माणसे वाचतील साहित्य वाचतील तीच माणसे समाजात विशेष कार्य करू शकतात. आपण समाजाचे देणेकरी आहोत अशी भावना घेऊन सर्वांनी कार्य केले पाहिजे. यानंतर कवी. शामराव सरकाळे, कवी देवेंद्र गावंडे, कवी रशीद आत्तार, कवी आय. के. शेख, गायक सनी डाडर, कवी जयवंत पवार, अशा अनेक मान्यवर कवींनी आपल्या बहारदार हास्य कविता सादर केल्या. अतुल पवार, सागर लोहार, अविनाश बोराडे, अशोक सोनवणे, सुनिता बेंडे, संजय बेंडे, डॉ.सहदेव भवाळ सभागृहातील काव्य रसिकांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवून मराठी भाषा अभिजीत दर्जाचा आनंद काव्यसुमने उधळून साजरा केला. कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार राजेंद्र सगर यांनी व्यक्त केले.