You are currently viewing हिंदू धर्म रक्षणासाठी कडवट व कट्टर असणे काळाची गरज : आ. नितेश राणे…

हिंदू धर्म रक्षणासाठी कडवट व कट्टर असणे काळाची गरज : आ. नितेश राणे…

हिंदू धर्म रक्षणासाठी कडवट व कट्टर असणे काळाची गरज : आ. नितेश राणे…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बांद्यात दुर्गा माता दौडचे आयोजन…

बांदा

हिंदू धर्माच्या विरोधात आज षडयंत्र सुरू आहे. हिंदू समाज धर्म रक्षणासाठी जागा होत नाही ही मोठी खंत आहे. धर्मासाठी कट्टर व कडवट झालो नाही तर भविष्यात गंभीर स्थिती येऊ शकते. सन २०४७ पर्यंत भारत देश इस्लामिक राष्ट्र करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. हातातून परिस्थिती गेल्यानंतर आंदोलने व रस्त्यावर उतरून काहीही होणार नाही. हिंदू ही तुमची ओळख आहे हे कधीही विसरू नका. धर्म रक्षणासाठी कितीही टोकाचे पाऊल उचललात तरी तुमच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी आमची आहे, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी बांदा येथे दिला.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे बांदा येथे नवरात्रोत्सावनिमित्त ‘दुर्गा माता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये आ. नितेश राणे यांनी सक्रिय सहभाग घेतला. सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार झाला. त्यानंतर मोर्येवाडा, श्री पाटेश्वर नवरात्रौत्सव मंडळ आळवाडा, बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी व कट्टा कॉर्नर नवरात्रोत्सव मंडळ अशी दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याठिकाणी आ. नितेश राणे यांनी मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आ. नितेश राणे म्हणाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत गेली तीन वर्षे यशस्वीपणे दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. वर्षागणिक या दौडमध्ये हिंदूची वाढती संख्या आहे. हिंदू समाज धर्म रक्षणासाठी जागा होत नाही ही निश्चितच खंत आहे. हिंदू समाज धर्मासाठी मोठ्या संख्येने या दौड मध्ये सामील होतील त्यावेळी आपल्या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्याची गरजच राहणार नाही. ९० टक्के हिंदु राहत असतील तर ते राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे. असे असतानाही हे हिंदू राष्ट्र आहे का ? असा प्रश्न विचारण्यात येतोय हे दुर्दैव आहे. कोरोना थांबवण्यासाठी जशी वॅक्सिन आली तशी हिंदूंना जागा करण्यासाठी वॅक्सिन बाजारात आणणे आवश्यक आहे. हिंदू समाज विरोधात सर्वत्र जोरदार षडयंत्र सुरू आहे. हे न ओळखल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात एका आमदाराने सांगितले की, २०२७ मध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार येऊच शकत नाही. यावरून ही लढाई किती खोलात गेली आहे याचा विचार करा. धर्मासाठी कट्टर व कडवट झालो नाहीत तर भावी पिढीसाठी किती धोका आहे याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आता तर देशात व्होट जिहाद सुरू आहे. एका समाजाने एकत्र येऊन एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी फतवे काढले जातात. मतदान कोणालाही करा. मात्र, हिंदू मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाही. त्यांना वारंवार विनंती कराव्या लागतात. मात्र, मोहल्यामध्ये सकाळीच मतदान केले जाते. एका मतदाराकडून अनेक वेळा मतदान करण्याची स्पर्धा स्पर्धा लावण्यात येते.

ठाणे ग्रामीण येथील पडगा गावात दहा वर्षांपूर्वी ९० टक्के हिंदू होते. आज तो गाव मुस्लिम बहुल झालाय. हिंदू हाताच्या बोटावर मोजणे एवढेच राहिले आहेत. त्या गावाचे नाव अलशाम झालय. यावरून २०४७ पर्यंत भारत देश इस्लामिक राष्ट्र करण्याची तयारी जोरदारपणे सुरू झाल्याचे स्पष्ट होते. हिंदू ही तुमची ओळख आहे हे कधीही विसरू नका.

बांदा ही जिल्ह्यातील सर्वाधिक उलाढालीची बाजारपेठ आहे. भविष्यात खरेदी फक्त हिंदू दुकानातूनच करणार अशी शपथ घ्या. दिवाळीत हा प्रयोग करून याचे काय परिणाम होतात ते पहा. गोव्यातून येणाऱ्या खरेदीदारांचीही याबाबत जागृती करा.

मुरुडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गणेश मूर्तींची विटंबना करण्यात आली. परिस्थिती हाता बाहेर जाण्याअगोदर हिंदू समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे. कट्टरपणा व कडवट होणे ही काळाची गरज आहे. दुसऱ्या धर्मीयांच्या ऊरूसवर दगडफेक झाली असती तर काय झाले असते याचा विचार करा. आपल्याला भविष्यात शब्दापलीकडे कृतीतून माझा पाठिंबा असेल. धर्म रक्षणासाठी कितीही टोकाचे पाऊल उचललात तरी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी जि.प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, अशोक सावंत, शितल राऊळ, ग्रा. पं. सदस्य रूपाली शिरसाट, श्रिया केसरकर, राखी कळंगुटकर, निलेश सावंत, बाबा काणेकर, केदार कणबर्गी, गुरुनाथ सावंत, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, अभिलाष देसाई, संजय नाईक, नाना शिरोडकर, प्रसाद पावसकर, स्

प्रतिक्रिया व्यक्त करा