*कोण म्हणतं तू म्हातारा झाला*?
आत्ताशिक तर तू फक्त साठीचा झाला,
मी आता थकलो, दमलो असं सारखं सारखं म्हणू नको,गड्या रं तुला विनंती आहे बळंच म्हातारपण आणू नको,
आता सुन आली, नातू झाला, नात झाली, जावई आला म्हणजे म्हातारपण येत नसतं, स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं कि वार्धक्य येत असतं…
डाय कर, करू नको हां तुझा वैयक्तिक प्रश्न आहे..नीटनेटकं टापटीप राहयचं एवंढच आमचं म्हणणं आहे.बैलाला झुली घातल्यासारखे गबाळे ड्रेस घालू नको..उगीचच अधर अधर जीव गेल्यासारखं चालू नको.लोकांनी आपल्याला काहीही म्हणो आपण मात्र स्वतःला सुंदर समजावं, रिटायर्ड झालो, साठी आली तरी रोमॅंटीक गाणं गात राहावं…पोथ्या, पुराणं, जपतप, कुलाचार याला आमचा विरोध नाही
पण मी आता म्हातारा झालो असं अजिबात म्हणायचं नाही,जरी साठी आली तरी स्वःतासाठी वेळ द्यायचा..
मित्र- मैत्रिणीचा गृप करायचा व ट्रीपला जायचा प्लॅन करायचा अन् जीवनाचा आनंद घ्यायचा आणि हो दुःखाचे तुणतुणे वाजवायचे नाही. प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही..
घराच्या बाहेर पडायचं..मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरव्यागार निर्सगाला पाहून धुंद होऊन मारवा गायचा..
फिट राहण्यासाठी सगळं करायचं, हलका व्यायाम, योगापण 😊आयुष्याची मजा आठवायची.त्यातच डुबुन जायचं😂😄✌️😃
*अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*✒️✒️✒️✒️