You are currently viewing आरती सरस्वतीची

आरती सरस्वतीची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित सरस्वतीची आरती*

 

*आरती सरस्वतीची*

 

जय देवी जय माते जय सरस्वती

अक्षर धन सन्मान विद्या सुखदाती ||धृ॰||

………………..जय देवी जय देवी

 

निरक्षीर विवेक शिकवी तुज बाळां

माते तुजवाचून कशी शिकू मी शाळा ||१||

………………..जय देवी जय देवी

 

विश्वची माते होई अखंड सुखशाळा

संजीवन ज्ञानामृत पाजी वेल्हाळा ||२||

………………..जय देवी जय देवी

 

भावभक्तीने माते ओवाळितो आरती

जीवन सुखज्ञानास नमितो भारती ||३||

………………..जय देवी जय देव

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,

जि. :- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा