You are currently viewing लोककला कलावंत साहित्यिक परिषद, वडाळा, जि. अहमदनगर येथे कवि संमेलनाचे आयोजन

लोककला कलावंत साहित्यिक परिषद, वडाळा, जि. अहमदनगर येथे कवि संमेलनाचे आयोजन

ठाणे प्रतिनिधी –

साहीत्यसेवेचा भाग म्हणून, लोककलावंत साहित्य परिषद, वडाळा, ता-श्रीरामपुर, येथे कवि संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. ह्या एक दिवसीय साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे कवी संमेलनांत, प्रसिद्ध कवी – गोरखनाथ पवार निंभारी जि-अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली वडाळा महादेव ता. श्रीरामपूर जि. -अहमदनगर येथे आयोजित केले आहे. तरी सर्व कवी,आणि कवयित्री यांनी १०मार्च २०२४रोजी सकाळी ठिक ११ वाजता हजर रहावे अशी विनंती करुन आग्रहाने आमंत्रित करण्यात येत आहे.

कवीसंमेलनसाठी ज्या मान्यवर कवींना सहभागी व्हायचे आहे त्यांना आपल्या कवीता सादर करण्याची संधी देण्यात येईल तसे सर्व कवि मान्यवराना यथोचित सन्मान करण्यात येईल असे आयोजकातर्फे कळवण्यात आले आहे. तरी इच्छुक काव्यवाचन सहभागासाठी कवी व कवयित्रींनी लवकरच, खालील नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क-.

लोककला कलावंत साहित्यिक परिषद सर्व आयोजक आणि सदस्य व अध्यक्ष–श्री बाबासाहेब पवार संपर्क – ८७९६७४२२४३

कवी संमेलन अध्यक्ष – कवी- गोरखनाथ पवार संपर्क —९७६३७३८१८०

जगन्नाथ खराटे-ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 5 =