You are currently viewing ग्रामपंचायत कळसुली अंतर्गत, जि.प.शाळा हर्डी इमारत क्रमांक ११०० च्या नादुरुस्तीबाबत…

ग्रामपंचायत कळसुली अंतर्गत, जि.प.शाळा हर्डी इमारत क्रमांक ११०० च्या नादुरुस्तीबाबत…

ग्रामपंचायत कळसुली अंतर्गत, जि.प.शाळा हर्डी इमारत क्रमांक ११०० च्या नादुरुस्तीबाबत…

कणकवली

कणकवली तालुक्यातील कळसुली जि.प.शाळा हर्डी, शाळा ‌ छप्पर दुरावस्थेबाबत ‌1 जून 2022 तसेच 01 डिसेंबर 2023 रोजी गटशिक्षणाधिकारी‌ पंचायत समिती कणकवली यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर 24 जून 2024 ‌छप्पर दुरुस्तीकरीता, निधी उपलब्ध होणेबाबत ‌ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु आज तागायत यावर काहीही विचार विनिमय करण्यात आला नाही.

ग्रामपंचायत कळसुली अंतर्गत जि.प. शाळा इमारत क्र. ११०० इमारत अतिशय नादुरुस्त असून, कोसळण्याच्या स्थितीत आहे. सदर शाळा दुरुस्तीबाबत, वरिष्ठ कार्यालयात मागणी करुनही, दुरुस्तीबाबत अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. तरी, सदर शाळेमध्ये निवडणूक आयोगाचे मतदानकेंद्र क्रमांक. ३२४ केंद्र असल्याने, आगामी काळातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता, सदर इमारत गेरसोयीची ठरणार आहे. तरी आपण याची नोंद घेवून, सदर शाळेतील मतदान केंद्र क्रमांक. ३२४, तात्पुरत्या स्वरूपात अन्य शासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत, आपल्या स्तरावरुन निर्णय घेण्यात यावा. तसेच नादुरुस्त झालेली मूळ इमारत, दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे, आपल्या स्तरावरुन पाठपुरावा करण्यात यावा ‌ अशा आशयाचे निवेदन महसुल सहाय्यक
तहसिलदार कार्यालय, कणकवली ‌ यांना
सरपंच ग्राम पंचायत कळसुली ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. यांनी सादर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा