You are currently viewing दंत चिकित्सालयासाठी अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध…

दंत चिकित्सालयासाठी अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध…

दंत चिकित्सालयासाठी अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध…

काँग्रेस खा कुमार केतकर यांच्या निधीतून मिळाली सेवा:काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित लोकार्पण..

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत चिकित्सालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व मशनरी काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून (२२ लाख) उपलब्ध झाल्या आहेत.याचा लोकार्पण कार्यक्रम आज सम्पन्न झाला. त्यामुळे हा विभाग आता सक्षम झाला आहे, याचा सर्व सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे दंतचिकित्सा विभाग कार्यरत असला तरी येथे आवश्यक असलेल्या मशनरी उपलब्ध नसल्याने केवळ दात काढणे व दुखणाऱ्या दातांवर औषध उपचार करणे एवढीच आरोग्य सेवा दिली जात होती. मात्र काँग्रेसचे राज्यसभा खासदार डाॅ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील दंतविभागाला दिलेल्या २२ लाख रुपये निधीतून आवश्यक असलेल्या सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता दाताच्या सर्व आजारावर उपचार करणे शक्य झाले आहे.रुग्णाच्या दाताची कवळी, तसेच विविध आकाराचे दात बणविने हे आता येथे शक्य होणार आहे. त्यासाठी येथे तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. दाताच्या कोणत्याही आजाराच्या रुग्णाला अन्य ठिकाणी उपचार घेण्याची गरज नाही येथे सर्व उपचार मोफत दिले जाणार आहेत. सर्व सुविधायुक्त अशी दंत चिकित्सा लॅब इथे निर्माण झाली आहे. अशी माहिती डॉ. विनय सूर्यवंशी यांनी दिली.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार यांच्या खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या यंत्रसामुग्रीचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, नागेश मोरये, अभय शिरसाट, प्रकाश जैतापकर, एकनाथ धुरी, प्रकाश डिचोलकर, यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे तसेच जिल्हा रुग्णालयाचे विविध डॉक्टर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा